Menu Close

अवमान याचिका प्रविष्ट केल्यावर मशिदीवरील भोंगे बंद

ठाण्यातील मशिदीवरील भोंग्याचे प्रकरण

यासाठी अवमान याचिका का प्रविष्ट करावी लागते ? न्यायालयाच्या आदेशाचे पालन का केले जात नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ठाणे : येथील मो.ह. विद्यालयाशेजारच्या मशिदीवरील भोंगे विद्यार्थांच्या अध्ययनात अडथळे ठरत असून ते बंद करावेत, या मागणीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे डॉ. महेश बेडेकरयांनी पोलीस आणि राज्य सरकार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली. (न्यायालयाच्या निर्णयावर कार्यवाही होत नसल्याने अवमान याचिका प्रविष्ट करावी लागणे ही शोकांतिकाच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) इतर ठिकाणाहूनही अशा प्रकारच्या अवमान याचिका आल्याने एकत्रित सुनावणी होणार असल्याचे याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. याचिका प्रविष्ट केल्यानंतर सध्यातरी परिसरातील मशिदीवरील भोंगे वाजत नसल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यालयाजवळील मशिदीवरील भोंगे मुसलमानांच्या प्रार्थनांच्या वेळांमध्ये चालू असायचे. त्यामुळे अध्ययनात व्यत्यय येत असे. शांतताक्षेत्रातही असे घडत असल्याने जागरूक नागरिकांनी याविषयी तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


१८ मार्च २०१७

मशिदींवरील भोंग्यांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने उच्च न्यायालयात अवमान याचिका

  • मशिदींवरील अवैध भोंग्यांवर सरकार आणि पोलीस यांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित असतांना त्यासाठी नागरिकांना न्यायालयीन लढा द्यावा लागतो, हे लज्जास्पद ! जनतेला वेळीच योग्य न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • हिंदूंनी धार्मिक उत्सवांच्या वेळी लावलेल्या ध्वनीक्षेपकांवर ध्वनीप्रदूषणाच्या नावाखाली तात्काळ कारवाई करणारे पोलीस आणि प्रशासन न्यायालयाने आदेश देऊनही अन् नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही मशिदींवरील भोंग्यांच्या ध्वनीप्रदूषणावर कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? असे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावर आता न्यायालयानेच कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

 

ठाणे : येथील मो.ह. विद्यालयाच्या शेजारच्या मशिदींवरील भोंगे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे ठरत असून ते बंद करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी करूनही त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे डॉ. बेडेकर यांनी ठाणे पोलीस आणि राज्य सरकार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे. येत्या १७ मार्चला त्यावर सुनावणी अपेक्षित आहे.

१. डॉ. महेश बेडेकर हे गेल्या ८ ते १० वर्षांपासून ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात लढा देत आहेत. त्यांनीच प्रविष्ट केलेल्या याचिकेमुळे ध्वनीप्रदूषणावर अंकुश ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकार, पोलीस आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

२. ठाण्यातील एम्.एच्. हायस्कूलजवळ असलेल्या एका मशिदीवरील भोंग्यांवरून सकाळ, दुपार आणि संध्याकाळीही बांग दिली जाते. त्यामुळे शाळेतील अध्ययनात व्यत्यय येत असल्याची तक्रार काही जागरूक नागरिकांनी डॉ. बेडेकर यांच्याकडे केली होती.

३. एम्.एच्. शाळेचा परिसर हा शांतता क्षेत्रामध्ये येत असून तिथे कोणत्याही ध्वनीप्रदूषणास बंदी आहे; मात्र त्यानंतरही या भोंग्यांना पोलिसांनी अनुमती दिली आहे का, अशी विचारणा बेडेकर यांनी केली होती.

४. त्यावर अनुमती दिली नसल्याचे उत्तर बेडेकर यांना पोलिसांकडून आले होते. जर हे भोंगे अवैध असतील आणि ध्वनीप्रदूषण करत असतील, तर ते कृपया बंद करावेत, अशी विनंतीही बेडेकर यांनी पोलिसांना केली होती; मात्र त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नसून आजही भोंगे तेवढ्याच आवाजात चालू आहेत.

५. लेखी तक्रार केल्यानंतरही पोलीस कायद्यानुसार ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर
डॉ. बेडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट केली आहे.

६. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन ठाणे पोलिसांकडून होत नसल्याचे याचिकेत नमूद करून त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पोफळे आणि राज्य सरकारला त्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. (मशिदींवरील भोग्यांवर कारवाई होण्यासाठी एका नागरिकाला एवढा लढा द्यावा लागतो, हे सरकार आणि पोलीस यांना लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

७. उल्हासनगर येथील ध्वनीप्रदूषणाच्या विरोधातील कारवाईत दिरंगाई केल्याने १४ मार्च या दिवशी उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासह ९ जणांविरुद्ध न्यायालयाने अवमानाची (कंटेम्प्ट) नोटीस बजावली आहे.

८. न्यायालयातील या अवमान याचिकेनंतर ठाणे पोलिसांनी ज्या मशिदींवरील भोंगे ध्वनीप्रदूषण करत आहेत, त्यांचा अहवाल संकलित करण्यास प्रारंभ केला आहे आणि त्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीसदलातील विश्‍वनीय सूत्रांनी दिली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *