हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग
अमरावती : येथील टाकळी जहागीर या गावातील गावकर्यांनी शिवजयंतीनिमीत्त प्रतिमा पूजन आणि व्याख्यान यांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रतिमापूजनाने करण्यात आल्या. या वेळी पंचायत समिती सदस्य सौ. रोशनीताई अळसपुरे, तसेच शिवसेना कार्यकर्ता नानाभाऊ नागमोते यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी २०० युवकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद साखरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘आपण राष्ट्रपुरुषांच्या जयंतीनिमित्त केवळ एकत्र येऊन चालणार नाही. एक हिंदू म्हणून संघटित होऊन आपल्याला धर्मियांवर यापूर्वी जी आक्रमणे झाली, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श आपण समोर ठेवून त्यांच्यासारखे धर्मकार्य करण्याच्या संकल्प करायला हवा.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात