हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि ग्रंथप्रदर्शन यांचेही आयोजन
डेरवली : येथे १५ मार्चला शिवजयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजक आणि वडघर विभागप्रमुख श्री. प्रभाकर नाईक यांच्या पुढाकाराने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. एकवीरेहून डेरवली येथे शिवज्योतीचे आगमन झाले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर क्रांतिकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून श्रीफळ वाढवण्यात आले.
उरणचे शिवसेनेचे आमदार श्री. मनोहरशेठ भोईर, गुळसुंदे येथील शिवसेना विभागप्रमुख श्री. रघुनाथ पाटील, उरणचे पंचायत समितीचे सदस्य श्री. विजय पाटील, तालुका पनवेल शहर अध्यक्ष श्री. वासूशेठ घरत, शिवसेना उपजिल्हा अध्यक्ष श्री. शिरीष घरत, तसेच श्री. ऋषिकेश ठाकूर आणि श्री. सचिन पवार उपस्थित होते. सर्वांनी प्रदर्शनाची प्रशंसा केली.
या कार्यक्रमाला उपस्थित छत्रपती शिवाजी विद्यालय, पळस्पे येथील ५५ विद्यार्थी आणि ५ शिक्षक यांनीही प्रदर्शनाचा लाभ घेतला. २०० पेक्षा जास्त ग्रामस्थांनीही प्रदर्शन पाहिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात