Menu Close

धर्माचरण केल्यानेच लव्ह जिहादचा बीमोड करता येईल ! – सौ. अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

कार्यक्रमाला उपस्थित महिला

सोलापूर : लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंंदु मुली आणि महिला मोठ्या प्रमाणात धर्मांतराला बळी पडत आहेत. लव्ह जिहादचा वाढता धोका ओळखून हिंदूंनी संघटित व्हायला हवे. धर्माचरण केल्यानेच आपण लव्ह जिहादचा खंबीरपणे बीमोड करू शकू, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हा संघटक सौ. अलका व्हनमारे यांनी केले. राजीव नगर, सूत मील येथील तालीम सभागृहात आयोजित केलेल्या ‘लव्ह जिहाद – स्वरूप, व्यापकता आणि परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला १३० जण उपस्थित होते.

सौ. व्हनमारे पुढे म्हणाल्या, ‘‘आज हिंदु मुलींनी कितीही उच्च शिक्षण घेतले, तरी त्यांनी धर्म जाणून घेणे आवश्यक आहे. लव्ह जिहाद, धर्मांतरण, पाश्चात्यांचे अंधानुकरण या समस्यांना सामोरे जाण्यासाठी धर्माचरण करणे अत्यंत आवश्यक आहे.’’ या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी लव्ह जिहाद एक वास्तव’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘आज अल्पवयीन मुलींसमवेत विवाहित स्त्रियाही लव्ह जिहादला बळी पडत आहेत. त्यामुळे लव्ह जिहाद सामाजिक समस्यांचे रूप धारण करत आहे. याचा धोका वेळीच ओळखणे आवश्यक आहे. हिंदु धर्माचे महत्त्व जाणून घेण्यासाठी धर्म जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठीच आज हिंदूंना धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे.’’ या कार्यक्रमाचे आयोजन धर्माभिमानी श्री. शशिकांत मसले यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमाला १३० महिला आणि पुरुष उपस्थित होते.

क्षणचित्र : येथील महिलांनी धर्मशिक्षणवर्ग, तसेच ‘सात्त्विक रांगोळ्या’ या लघुग्रंथाचीही मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *