सांगली : विश्रामबाग येथील देवल बझार येथे मिरज, सांगली, सांगलीवाडी येथील परिसरातील हिंदुत्वनिष्ठांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यामागील उद्देश काय, हिंदूंनी आंदोलनात उपस्थित रहाण्याचे महत्त्व, आदर्श गुढी कशी उभारावी, हिंदुत्वाचे कार्य करतांना अधिवक्त्यांना संघटित करण्याचे महत्त्व, आगामी गणेशोत्सव आणि त्यात करावयाचे प्रयत्न याची माहिती हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे यांनी दिली. बैठकीनंतर धर्मजागृतीसाठी ठोस कृती करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला. या बैठकीसाठी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही उपस्थित होते. (हिंदुत्वसाठी एकत्रित येऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करणार्या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
गणेशोत्सव मंडळांना भेटण्याचे नियोजन !
बैठकीत अनेकांनी हिंदुत्वाचे कार्य करतांना येणार्या अडचणी सांगून त्यावर दिशा घेतली. गणेशोत्सवकाळात तरुणांना शास्त्र समजावून सांगून गणेशोत्सव कसा साजरा करावा, श्री गणेशमूर्ती कशा प्रकारची घ्यावी, ही माहिती सांगण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रत्येक रविवारी गणेशोत्सव मंडळांना भेटण्याचे नियोजन केले.
बैठकीसाठी भाजपचे किसान सभेचे सभेचे अध्यक्ष श्री. रोहित चिवटे, कुरुंदवाड येथील श्री. मंदार पाटुकले, सर्वश्री विनायक आनंदा चव्हाण, विकास माणिक आवळे, विष्णू हिंदुराव पाटील, गोविंद कोरडे, अमोल पवार, दीपक पवार, सागर जाधव, गणेश आनंदे, किरण बुटाले, शिवसेना मिरज शहर विधानसभा सदस्य श्री. तानाजी सातपुते, शिवसेनेचे श्री. किरण (भाई) कांबळे, हिंदु धर्माभिमानी श्री. दिगंबर कोरे, धर्मजागरण मंचाचे श्री. चंद्रकांत आवळे यांसह २२ हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. श्री. दिगंबर कोरे म्हणाले, ‘‘धर्मासाठी कार्य करणारे दैनिक सनातन प्रभात सर्व हिंदुत्वनिष्ठांपर्यंत पोहोचले पाहिजे.’’
२. शिवसेना मिरज शहर विधानसभा सदस्य श्री. तानाजी सातपुते म्हणाले, ‘‘मिरज शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांना आम्ही एकत्र करतो, तुम्ही शास्त्र सांगा.’’
३. प्रती मासाला बैठक घेऊन पुढील दिशा घेऊन कृती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात