भोजशाळेतील सरस्वतीदेवीची मूर्ती लंडनहून परत आणण्याचे हिंदूंचे स्वप्न मोदी शासन पूर्ण करेल, अशी अशा आहे !
श्री जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानन्द सरस्वती यांची मागणी
धार (मध्यप्रदेश) : काशी येथील सुमेरूपीठाचे श्री जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नरेंद्रानन्द सरस्वती यांनी हिंदू महासभेच्या पदाधिकार्यांसह येथील भोजशाळेची पाहणी करून श्री सरस्वतीदेवीचे दर्शन घेतले. या वेळी स्वामीजींनी दगडांपासून सिद्ध करण्यात आलेल्या आकृत्यांचीही पाहणी केली.
याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधतांना स्वामी नरेन्द्रानन्द सरस्वती यांनी लंडन येथील भोजशाळेतील सरस्वती देवीची मूर्ती परत आणून तिची स्थापना करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. पुढील मासात येथे येण्यासंदर्भात विचारल्यावर स्वामींनी ‘जेव्हा सरस्वतीदेवी बोलावेल, तेव्हा येऊ’, असे या वेळी उत्तर दिले.
भोजशाळेत जाण्यास स्वामीजींना प्रशासनाकडून अटकाव
स्वामीजींचे धार येथे आगमन झाल्यावर विश्रामगृहातून ते थेट ज्योति मंदिर येथे पोहोचले. स्वामी हिंदू महासभेच्या पदाधिकार्यांसह भोजशाळा येथे जात असतांना शहर दंडाधिकारी बिहारी सिंह यांनी त्यांना अडवले आणि आत जाऊन पूजा करण्यास मनाई केली. त्यानंतर स्वामीजींनी आम्ही केवळ भोजशाळेचे निरीक्षण करण्यास आलो असून पूजा करणार नाही, असे सांगितले. तेव्हा त्यांना सोडण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात