Menu Close

ऑस्ट्रेलियातील अँग्लिकन चर्चच्या विरोधात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या १ सहस्र १०० तक्रारी

  • भारतात आमिष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनरींना या वासनांधांविषयी हिंदूंनी विचारले पाहिजे !
  • जगभरातील बहुतांश चर्चमधील पाद्री वासनांध असतात, हेच आतापर्यंतच्या घटनांवरून उघड झाले आहे; मात्र याचे वृत्त भारतातील एकही प्रसारमाध्यम दाखवत नाही, हा त्यांचा निधर्मीवादी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

सिडनी (ऑस्ट्रेलिया) : गेल्या ३५ वर्षांत येथील अँग्लिकन चर्चच्या विरोधात अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या १ सहस्र १०० तक्रारी प्रविष्ट असल्यामुळे अँग्लिकन चर्चच्या प्रमुखांनी दु:ख व्यक्त केले. चर्चमध्ये शोषण झालेली मुले साधारण ११ वर्षे वयाची होती. या प्रकरणामध्ये चर्चने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची भरपाई दिली आहे.

१. रॉयल कमिशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांत चर्चचे ५६९ पाद्री, शिक्षक आणि कर्मचारी आरोपी होते.

२. मेलबर्नचे आर्चबिशप फिलीप फ्रेइर यांनी याविषयी वैयक्तिकरित्या दु:ख व्यक्त केले. ‘अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या प्रकारांमुळे आम्हाला धक्का बसला असून हे थांबवण्यात चर्च अपयशी ठरले आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी चर्चच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

३. चर्चच्या अ‍ॅनी हेवूड म्हणाल्या, ‘‘मुलांना सांभाळणारे चर्चमधील पाद्री, शिक्षक आणि अन्य कर्मचारी हे विश्‍वासू असले, तरीही आम्ही मुलांचे शोषण करणार्‍यांना थांबवू शकलो नाही, याची आम्हाला खूप लाज वाटते.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *