डिचोली (गोवा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागण्या
डिचोली (गोवा) : आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्रशासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा; हिंदु देवता, तसेच देशाचे पंतप्रधान यांचा हेतूतः अवमान करणारी वक्तव्ये करून सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणार्या मौलाना देहलवी यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी; ‘पी.एच्.डी.’ आणि ‘एम्.फिल्.’ हे उच्चशिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणारी २५ सहस्र रुपये मासिक शिष्यवृत्ती रहित करावी आणि मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, या मागण्यांना अनुसरून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली १८ मार्चला सायंकाळी डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ निदर्शने केली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग होता. या वेळीह.भ.प. रामकृष्ण गर्दे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी, रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर इत्यादींनी उपस्थितांना संबोधित केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात