चेन्नई : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भारत हिंदु मुन्नानी’ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी येथील हिंदु परिवाराच्या कार्यालयात एका अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या कार्यकर्त्या सौ. उमा रविचंद्रन् यांनी ‘हिंदु’ आणि ‘हिंदु धर्म’ या शब्दांचा अर्थ, हिंदु धर्माचे परिणामकारक कार्य करण्यासाठी साधनेची आवश्यकता यांविषयी माहिती दिली. याप्रसंगी भारत हिंदु मुन्नानीचे अध्यक्ष श्री. प्रभु, हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयकुमार आदी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. आपले कार्यकर्ते साधक बनावे, यासाठी भारत हिंदु मुन्नानीचे अध्यक्ष श्री. प्रभु यांनी या अभ्यासवर्गाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
२. श्री. प्रभु यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमधील भीडस्तपणा जाण्यासाठी त्यांना समोर येऊन विचार व्यक्त करण्यास सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात