Menu Close

सरसंघचालकांची आतंकवाद्यांशी तुलना केल्यामुळे एबीवीपी कडून तोडफोड !

सरसंघचालकांची आतंकवाद्यांशी तुलना करणे, ही बौद्धिक दिवाळखोरीच !

बरेली (उत्तरप्रदेश) : बरेली महाविद्यालयात हिंदी भाषेच्या संदर्भात चालू असलेल्या एका संमेलनात चौथीराम यादव या निवृत्त प्राध्यापकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची तुलना आतंकवाद्यांशी केल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी घोषणा देत कार्यक्रमस्थळाची तोडफोड केली. पोलिसांनी तोडफोड करणार्‍यांना कह्यात घेतले आहे. तसेच प्राध्यापकांच्या विरोधातदेखील तक्रार नोंदवण्यात आली आहे. ‘कार्यक्रमात झालेल्या भाषणाची चित्रफीत तपासून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असेही पोलीस अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

चौथीराम यादव त्यांच्या भाषणाच्या वेळी म्हणाले की, ‘रा.स्व. संघासारख्या संघटना आतंकवादी निर्माण करत आहेत.’ तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. त्यांच्यावर तक्रार प्रविष्ट झाल्यावर यादव म्हणाले की, मी कोणाच्या विरोधात विधान केलेले नाही आणि जर कोणाला तसे वाटत असेल, तर मी क्षमा मागतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *