राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
खालापूर (जिल्हा रायगड) : ‘शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून दोनदा साजरी का करायची ?’, असा प्रश्न व्हॉटस् अॅपवरील एका गटात विचारल्यामुळे खालापूर येथील केएम्सी महाविद्यालयाचे प्राध्यापक सुनील वाघमारे यांना अटक करण्यात आली. (छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तुंग कार्य पहाता प्रत्येक दिवशी त्यांचे स्मरण करून त्यांचा आदर्श घेऊन हिंदुत्वासाठी कार्य करणे आवश्यक असतांना, अशा शंका आणि प्रश्न उपस्थित करणारे हिंदुच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
प्रा. वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दोनदा साजरी करण्यावर टीका केली होती. त्यावेळी त्यांचे सहकारी प्राध्यापक अमोल नागरगोजे यांनी वाघमारे यांना त्यांचे विधान मागे घेण्यास सांगून हा गट डिलीट (बंद) केला; मात्र वाघमारे यांची पोस्ट महाविद्यालयात पसरली. त्यानंतर २ दिवसांनी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि अन्य प्राध्यापक यांनी वाघमारे यांना घेरले आणि त्यांच्यावर पोलीस कारवाईची मागणी लावून धरली. (अशी मागणी करणारे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात