आतंकवादाच्या सावटाखाली फ्रान्स !
पॅरिस : येथील ओर्ली विमानतळावरील महिला सुरक्षारक्षकाकडे असणारी रायफल हिसकावण्याचा प्रयत्न करणार्या जिहादी आक्रमणकर्त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे.
१८ मार्चच्या मध्यरात्रही ही घटना घडली. सियाद बेन बेलगसेम असे या जिहादी आक्रमणकर्त्याचे नाव आहे. सियाद याने महिला सुरक्षारक्षकाला त्याच्याकडील बंदूक दाखवून हात वर करण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ‘मी जर येथे मेलो, तरी अल्लासाठी मरेन.’ सियाद रायफल हिसकावल्यानंतर येथील चारचाकी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना २ सुरक्षारक्षकांनी त्याच्या दिशेने गोळीबार करत त्याला ठार केले. सियाद बेन बेलगसेम याला ठार मारल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. या वेळी त्याच्या घरातून कोकीन जप्त करण्यात आले. याप्रकरणी सियाद याच्या वडील आणि भाऊ यांना पोलिसांनी कह्यात घेतले असून तपास चालू आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात