राऊरकेला (ओडिशा) : येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने वेदव्यास येथील संगमक्षेत्रावर प्रतिवर्षीप्रमाणे एका मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात विविध आध्यात्मिक संस्था आणि संघटना यांनी स्थापन केलेल्या भारतीय संस्कृती सुरक्षा समितीच्या वतीने अलीकडेच अध्यात्म मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धार्मिक आचरणामागील महत्त्व आणि शास्त्र’ यांवर आधारित ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली, तसेच राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघांताविषयी श्री. प्रकाश मालोंडकर यांनी विचार व्यक्त केले.
भारतीय संस्कृती सुरक्षा समितीची स्थापना आर्ट ऑफ लिव्हींग, गायत्री परिवार,प.पू. आसाराम बापू संप्रदाय, प्रजापिता ब्रह्माकुमारी, संस्कृत महाविद्यालय, आर्य समाज, हिंदु जनजागृती समिती इत्यादी आध्यात्मिक संस्था आणि संघटना यांनी नुकतीच केली आहे.
क्षणचित्रे
१. धर्माचरणाचे महत्व सांगणारे फलक या ठिकाणी लावण्यात आले होते.
२. या मेळाव्यात येथील अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचे धर्मजागृतीपर कार्यक्रम सादर केले.
३. भारतीय संस्कृती सुरक्षा समितीच्या प्रतिदिन सायंकाळी होणार्या परिसंवादामध्ये श्री. प्रकाश मालोंडकर यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी विचार मांडले.
४. या मेळाव्याला उदासिन आखाड्याचे प.पू. अग्निबाबा यांची वंदणीय उपस्थिती होती.