मानखुर्द : येथील स्थानिक धर्माभिमानी आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने महिलांसाठी लव्ह जिहादच्या दृष्टीने प्रबोधन आणि जनजागृती यांचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन श्री गणेश सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. रघुनाथ शिंदे यांनी केले होते. समितीच्या सौ. नयना भगत यांनी लव्ह जिहादविषयी स्त्रियांना माहिती दिली आणि काही चलचित्रे (व्हिडिओ) दाखवले. महिलांनी शंकानिरसनही करून घेतले आणि हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेल्या लव्ह जिहादच्या ग्रंथांची मागणीही केली. या कार्यक्रमात ६० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
क्षणचित्रे
१. लव्ह जिहादमध्ये फसून धर्मांधासमवेत गेलेल्या १६ वर्षांच्या पीडित मुलीची आई आणि नातेवाईक कार्यक्रमात उपस्थित होते.
२. एक धर्मांध स्त्री मंदिराच्या आवारात खेळणार्या मुलांकडे कार्यक्रमाची चौकशी करत होती.
३. काही धर्मांध मंदिराच्या प्रवेशद्वारावर थांबून कार्यक्रमाविषयी जिज्ञासा दाखवत होते. (किती हिंदू धर्मांधांच्या कार्यक्रमाच्या संदर्भात अशी जिज्ञासा दाखवतात ? – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात