नाशिक : येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १८ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु देवतांचा अवमान करणार्या मौलाना देहलवी यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी करा, या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.
आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी उगले, रणरागिणी शाखेच्या श्रीमती वैशाली कातकाडे, सनातन संस्थेच्या सौ. ज्योती पंडित, हिंदुत्वनिष्ठ श्री. अनिल पाटील, अन्य हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना आंदोलनातील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात केलेल्या अन्य मागण्या
१. आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ धर्मांतरबंदी कायदा करावा.
२. ‘पी.एच्.डी.’ आणि एम्.फिल् करणार्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मासिक २५ सहस्र रुपये शिष्यवृत्तीवेतन देण्याचा कर्नाटक शासनाचा निर्णय रहित करावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात