धर्मपरंपरांच्या रक्षणार्थ चळवळीमध्ये सहभागी झालेल्या शिवसेना महिला आघाडीचे अभिनंदन !
नगर : २६ जानेवारीला पुरो(अधो)गामी आणि नास्तिकतावादी महिला शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. पोलिसांनी या नास्तिकतावादी महिलांना रोखावे अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी शिवसेना महिला आघाडीच्या सौ. सुषमा पाडुळे आणि सौ. आशा निंबाळकर यांनी दिली. याविषयीचे निवेदन त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक श्री. मालकर यांना २२ जानेवारी या दिवशी दिले. या वेळी शिवसेनेच्या नगरसेविका कांता बोठे, शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अरुणा गोयल आदी अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, चौथर्यावर चढण्याच्या नास्तिकतावादी कृत्याला आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत. पोलिसांनी या नास्तिकतावादी महिलांचे षड्यंत्र हाणून पाडावे अन्यथा आम्हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पोलीस प्रशासनाने संबंधित महिलांवर वेळीच कारवाई करून त्यांना नगर जिल्हा प्रवेशबंदी करावी. तसे न झाल्यास चौथर्यावर चढण्याचा चुकीचा प्रकार थांबवण्यासाठी शिवसेना तिच्या पद्धतीने उत्तर देईल
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात