बोधन (तेलंगण) : येथील श्री महालक्ष्मी कल्याण सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. याला ३५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. चिल्कुर बालाजी देवस्थानमचे प्रधानाचार्य श्री. सी.एस्. रंगराजन, शिवसेनेचे इंदूर (निजामाबाद) जिल्हाध्यक्ष श्री. गोपी किशन, हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. चेतन जनार्दन आणि रणरागिणीच्या राज्य प्रवक्ता सौ. विनुथा शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन सौ. तेजस्वी वेंकटापूर यांनी केले. या सभेत हिंदूंना जागृत होण्याचे आवाहन करण्यात आले.
श्री. सी.एस्. रंगराजन यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले की, हिंदु त्यांचा धर्म, संस्कृती यांना विसरले आहेत. त्यांना जागृत करण्याची आवश्यकता आहे.
मार्गदर्शनात श्री. चेतन जनार्दन म्हणाले, ‘‘बोधन येथे ‘वंद स्थाम्बाला गुडी’ नावाचे पुरातन मंदिर आहे; मात्र सरकारने या मंदिराची ‘देवल मशीद’ म्हणून नोंद केली आहे. या अन्यायाचा हिंदूंनी विरोध करायला हवा. अशी स्थिती देशभरात आहे. ही स्थिती केवळ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतरच पालटू शकते.’’
श्री. गोपी किशन म्हणाले, ‘‘बोधनच्या लोकसंख्येमध्ये हिंदु अल्पसंख्यांक झाले आहेत. येथील हिंदूंचा विनाश होण्यास अधिक वेळ लागणार नाही. यासाठी हिंदूंनी लवकर जागृत व्हावे, अशी मी देवाला प्रार्थना करतो.’’
क्षणचित्र : शिवसैनिक सभेपूर्वी येथे दुचाकी फेरी काढून सभागृहात पोचले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात