सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती अनेक वर्षांपासून हेच सांगत आली आहे आणि यासाठी न्यायालयातील याचिकेवरही असा आदेश देण्यात आला आहे ! त्यामुळे केंद्र सरकारने असा आदेश देणे, हे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे यश आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : सर्वांनी ध्वजसंहिता २००२ चे कठोरपणे पालन करावे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केल्याने ध्वजसंहितेचा अवमान होत आहे. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज इतस्ततः फेकण्यात येतात. प्लास्टिक असल्याने त्याचे विघटन लवकर होत नाही. त्यामुळे ध्वजाचा अवमान होतो. यामुळे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. केवळ जैविक पद्धतीने नष्ट होऊ शकणार्या कागदी अथवा कापडी राष्ट्रध्वजांचा वापर करावा, असा आदेश केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय खाते यांना दिले आहेत. ‘या आदेशाचे कठोरपणे पालन करावे, जर त्याकडे दुर्लक्ष करून राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्यास, त्यावर कठोरपणे कारवाई करण्यात यावी’, असेही यात म्हटले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात