निपाणी : लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी करा, आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी विविध मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा, सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणार्या मौलाना देहलवी यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, कर्नाटक शासनाचा ‘पी.एच्.डी.’ आणि ‘एम्.फिल’ करणार्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मासिक २५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती वेतन देण्याचा निर्णय रहित करावा, या मागण्यांसाठी २० मार्च या दिवशी बेळगाव नाका, निपाणी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
या वेळी भाजपचे प्रधान कार्याध्यक्ष श्री. प्रणव मानवी, श्रीराम सेनेचे श्री. चव्हाण, सर्वश्री राजू कोपर्डे, अजय पाटील, अमोल संकपाळ, धर्माभिमानी सर्वश्री शांतिनाथ कासार, संजय पांगेरी, चारुदत्त पावले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे आणि श्री. अनिल बुडके यांच्यासह ३८ हून अधिक जण उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदार एन्.बी. गेज्जी यांना निवेदन देण्यात आले.
क्षणचित्रे
१. आंदोलनासाठी पोलिसांचा मोठ्या संख्येत बंदोबस्त होता. (हिंदु जनजागृती समितीचे कार्य सनदशीर मार्गाने चालत असल्याने पोलिसांनी हीच शक्ती गुन्हे अन्वेषण करण्यासाठी वापरावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. आंदोलनाच्या कालावधीत ‘आयसीबी न्यूज चॅनल’ने समितीचे श्री. किरण दुसे यांची मुलाखत घेतली. त्यामुळे हा विषय चिक्कोडी, संकेश्वर, निपाणी, हुक्केरी या भागात पोहोचला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात