भांडुप येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
मुंबई : आतंकवादी कारवायांमध्ये पकडले गेलेले बहुतांश धर्मांध आतंकवादी हे उच्चशिक्षित असतात. कर्नाटक सरकारने उच्चशिक्षित अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे घोषित करून एकप्रकारे राष्ट्रद्रोहच केला आहे. अशा राष्ट्रदोही निर्णयांतूनच पुढे कन्हैया कुमारसारखे देश तोडण्याची भाषा करणारे विद्यार्थी निपजतात. त्यामुळे आपण सर्वांनी या निर्णयाचा निषेध केला पाहिजे, असे आवाहन हरिद्वार निरंजन आखाड्याचे स्वामी बोधानंद पुरी यांनी भांडुप येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केले. येथे १९ मार्चला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘भारतभूमी ही पवित्र आध्यात्मिक भूमी आहे. येथे बाहेरून ख्रिस्ती धर्मगुरू येऊन राजरोसपणे हिंदु बांधवांचे धर्मांतर करतात. याला आतापर्यंतचे राज्यकर्ते कारणीभूत आहेत. भाजप शासनाने धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा करून आपण हिंदुत्वनिष्ठ पक्ष आहोत, हे सिद्ध करून दाखवावे.’’
आंदोलनात करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. अंगारकी चतुर्थीनिमित्त सुरक्षेचे कारण पुढे करून मुंबईतील श्रीसिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यात घातलेली बंदी मागे घ्यावी !
२. हिंदूंच्या लोकसंख्येत होणारी घसरण थांबवण्यासाठी केंद्रशासनाने त्वरित धर्मांतरबंदी कायदा पारित करावा !
३. कर्नाटक राज्यात पी.एच्.डी. आणि एम्.फील्.चे उच्चशिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्यांक विध्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती रहित करण्यात यावी !
क्षणचित्रे
१. आंदोलन पाहून हरिद्वार निरंजन आखाड्याचे स्वामी बोधानंद पुरी हे स्वत:हून आंदोलनात सहभागी झाले.
२. आंदोलनांच्या घोषणांमुळे प्रभावित होऊन १५ धर्माभिमानी हिंदू आपणहून आंदोलनात सहभागी झाले.
३. हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्माभिमानी सर्वश्री गणेश मोरे, गणेश पाटील, प्रतिक नायक आणि सौरभ मंडलिक यांनी पुढाकार घेऊन आंदोलनात विषय मांडले.
मान्यवरांचे विचार
विद्यार्थ्यांच्या जखमांवर मीठ चोळणार्या कर्नाटक सरकारचा निषेध ! – कु. नीलम काशीद, विद्यार्थिनी
‘शिक्षणक्षेत्रात गुणवत्तेला डावलून जातीच्या आधारावर दिल्या जाणार्या आरक्षणामुळे राज्यकर्त्यांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची प्रचंड हानी केली आहे. आता तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेतांना २५ सहस्र रुपयांची मासिक शिष्यवृत्ती देऊन कर्नाटक सरकार आमच्या जखमांवर मीठ चोळत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यार्ंच्या वतीने मी कर्नाटक सरकारचा निषेध करते. कर्नाटक सरकारने हा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा.
छत्रपती शिवरायांचे मावळे बनून धर्मांतराच्या विरोधात एकवटूया ! – आशुतोष दळवी, धर्माभिमानी
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम अन् कर्तृत्व यांमुळे पोर्तुगीज, डच यांसारख्या ख्रिस्ती लोकांना हिंदूंचे धर्मांतर करणे शक्य झाले नाही. धर्मांतराविषयी सरकार काही करणार नसेल, तर आपण छत्रपती शिवरायांचे मावळे बनून धर्मांतराच्या विरोधात एकवटूया.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनीही आपले विचार मांडले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात