Menu Close

गोहत्या करणाऱ्यांचे हात-पाय तोडायला लावेन : विक्रम सैनी, भाजप आमदार

उत्तरप्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना भाजप आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्या करणाऱ्यांचे हात पाय तोडायला लावेन अशी धमकी दिली आहे. उत्तरप्रदेशमधील राज्यमंत्री सुरेश राणा यांच्या सत्कार समारंभात विक्रम सैनी यांनी हे विधान केले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपने मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथांना संधी दिली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात सुरेश राणा यांनाही स्थान देण्यात आले आहे. राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यावर सुरेश राणा शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये आले होते. राणा यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोहत्येवर भाष्य करत असताना विक्रम सैनी म्हणाले, जी लोक गाईला मानत नाही आणि तिची हत्या करतात, अशा लोकांचे मी हात-पाय तोडायला लावेन. तसेच जे ‘वंदे मातरम्’ म्हणत नाही किंवा ‘भारत माता की जय’ म्हणताना ज्याला अभिमान वाटत नाही त्यांचेही हात- पाय तोडायला लावणार असे ते म्हणालेत.

माझ्याकडे तरुणांची टीम आहे. ही टीम अशी आहे जी युद्धप्रसंगी चीन आणि पाकिस्तानविरोधात सीमा रेषेवर वेतन न घेताही लढू शकते असा दावाही त्यांनी केला.

स्त्रोत : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *