Menu Close

हिंंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज-संभाजी महाराज हेच आदर्श समोर ठेवावेत ! – अभिजित घुले, बजरंग दल

तासगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मनोगत व्यक्त करतांना कु. प्रतिभा तावरे

तासगाव (जिल्हा सांगली) : हिंदूंनी त्यांची पराभूत मानसिकता सोडून आपल्या पराक्रमी पूर्वजांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आजच्या काळात हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रती संभाजी महाराज हेच आदर्श समोर ठेवून कृती केली पाहिजे, असे मत बजरंग दलाचे सहसंयोजक श्री. अभिजित घुले यांनी व्यक्त केले. ते २३ मार्च या दिवशी बागणे चौक येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. या आंदोलनासाठी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदू धर्माभिमानी असे ५० हून अधिक जण उपस्थित होते.

आंदोलनात करण्यात आलेल्या काही मागण्या

१. कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती – लोकशाहीचे अधःपतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी करा !

२. कु. उज्जवला खेराडकर, सनातन संस्था – श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास घातलेली बंदी मागे घ्या !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *