१. निवेदन देणे
‘२६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त कागदी वा प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरून केला जाणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात सुंदरगढ जिल्ह्यातील बीरमित्रपूरच्या तहसीलदार श्रीमती ज्योत्स्नाराणी साहु यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु सेनेचे श्री. जयराज ठाकूर, सनातन संस्थेचे श्री. श्रीराम काणे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर उपस्थित होते. या संदर्भात शासकीय स्तरावर जे शक्य आहे, ते करण्याचे आश्वासन श्रीमती साहु यांनी या वेळी दिले.
२. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भातील ध्वनी-चित्रचकतीच्या माध्यमातून शाळांमधून प्रबोधन
वरील विषयाच्या संदर्भात विद्यार्थी आणि समाज यांत जागृती करण्याच्या संदर्भातील निवेदन वेदव्यास, कलुंगा, कौरमुंडा, बीरमित्रपूर, लासे-कुमझरीया या सुंदरगढ जिल्ह्यामधील गावांतील एकूण ९ विद्यालयांच्या मुख्याध्यापकांना भेटून देण्यात आले. या वेळी प्रत्येक मुख्याध्यापकांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती निर्मित ध्वनी-चित्रचकतीही दाखवण्यात आली. सर्व विद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी ही ध्वनी-चित्रचकती शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दाखवून ‘राष्ट्रध्वजाचा मान राखण्याच्या संदर्भात प्रबोधन करू’, असे आश्वासन दिले.’
३. ओडिशामधील राऊरकेला येथे विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या यज्ञाच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींच्या सभेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्र आणि धर्म’ या विषयावर प्रवचन !
‘२६ जानेवारीला विश्व हिंदू परिषदेने हनुमानचालीसा पठण आणि यज्ञ आयोजित केला होता. या वेळी राऊरकेला परिसरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींच्या सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मी ‘राष्ट्र आणि धर्म’ या विषयावर विचार व्यक्त केले. या वेळी ४०० नागरिक उपस्थित होते.’
– श्री. प्रकाश मालोंडकर, राऊरकेला, ओडिशा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात