Menu Close

अतिरेक्यांना बडवणारा हिंदु हवा ! – उद्धव ठाकरे यांचा घणाघात

uddhavमुंबई : केवळ देवळात घंटा वाजवणारा हिंदु नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू या देशात उभा राहणार आहे कि नाही ? केवळ शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या मार्गावरून आपण चाललो आहोत, असे होत नाही. इसिसचे जाळे देशभरात खोलवर पसरले आहे. आम्ही त्यांच्याकडे केवळ ईदचे बकरे बनून जायचे का ? चालवा, आमच्या मानेवर सुरा चालवा ! असे म्हणायचे का ? शासन जर आमचे संरक्षण करायला समर्थ नसेल, तर हिंदूंनाही त्याच भाषते उत्तर द्यावेच लागेल. ही शिकवण जर आपण पाळली नाही, तर स्वतःला वाघ नव्हे, तर शेळ्या-मेंढ्या म्हणवून घ्या, असे घणाघाती उद्गार श्री. उद्धव ठाकरे यांनी काढले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. श्री. ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत हिंदुष्ट्यांवर प्रहार केला.

या वेळी श्री. उद्धव ठाकरे म्हणाले…

१. सध्या हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये चर्चा चालू आहे. ही चर्चा किती काळ चालू राहील माहीत नाही; पण आक्रमणे होत आहेत. पठाणकोटवर आक्रमण झाले. पुन्हा कधी कुठले आक्रमण होईल माहीत नाही. आपण मात्र मागील पानावरून पुढे जातोय. आपण पुरावे द्यायचे आणि त्यांनी नाकारायचे हेच चालू आहे. खलित्यामागून खलिते दिले. पठाणकोटचा बदला घेऊ, असे संरक्षणमंत्री म्हणाले; पण कसा घेणार बदला ? केवळ चर्चा करून ? हळुवारपणे चिडीचे रूपांतर थंड गोळ्यात होते कि काय असे वाटते. किती काळ चालणार असे, किती काळ करायची चर्चा ? पाकसमवेत चर्चा करण्याचा काही उपयोग आहे काय ? पाकला त्यांच्या भाषेतच उत्तर देऊ, ही भाषा कोण शिकवणार ? आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार कधी ?
२. मी दादरी हत्येचे समर्थन करत नाही; पण हिंदु धर्माची जरा बाजू घेतली, तर असहिष्णु ठरवले जाते. पुण्यात सावन राठोड याला केवळ हिंदू असल्याने पेटवले. हे असहिष्णुतेच्या व्याख्येत बसते कि नाही माहीत नाही, त्यावर कुणी चर्चा करणार कि नाही माहीत नाही. त्याचा कोणी निषेधही करणार कि नाही माहीत नाही; पण हिंदु मेला हे खरे आहे.
३. शिवसैनिक कसा असतो, हे रमेश वाळूंज याने दाखवून दिले. तो बुडणार्‍या मुलींचे फोटो काढत बसला नाही. त्याने घरी पत्नी आणि मुलगी आहे याचा विचार केला नाही. आपल्यानंतर घरदार कोण चालवेल, हे त्यांनी पाहिले नाही. पाण्यात उडी मारतांना त्या बुडणार्‍या मुली हिंदू आहेत कि मुसलमान याचा विचार केला नाही. हीच आमची शिकवण आहे. यालाच म्हणतात हिंदुत्व आणि यालाच म्हणतात राष्ट्रीयत्व.
४. इकडे आम्हाला सल्ले मिळतात, लोकसंख्या वाढवा. कशाला ? मरायला कि मारून घ्यायला ? असहिष्णुतेचे हे वातावरण नवीन नाही. शिवसेनाप्रमुखांनी कधी त्याची पर्वा केली नाही. मी हिंदू आहे, असे म्हणणारे ते एकमेव युगपुरुष होते.
५. शिवसेनाप्रमुख आणि मुंबईकरांचे नाते घट्ट आहे. हाती कोणतीही सत्ता नाही, कोणतेही पद नाही, पोलीस नाही, असे असतांनाही १९९२-९३ मध्ये मुंबई शिवसैनिकांच्या भरवशावर वाचवणारे शिवसेनाप्रमुख एकमेव नेते होते.
६. इकडे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. मुंबई महापालिकेवरच नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेवरही फडकल्याशिवाय रहाणार नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *