मुंबई : रणरागिणी शाखेच्या वतीने येथील नवनिर्वाचित उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीनिर्मित शुभेच्छा पत्र देऊन त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी रणरागिणी शाखेच्या मुंबई जिल्हा समन्वयक सौ. नयना भगत, समितीच्या सौ. शर्मिला बांगर आणि सनातनच्या सौ. मेघना सागवेकर उपस्थित होत्या. सनातनचा ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ ग्रंथ सौ. वरळीकर यांना भेट देण्यात आला. त्यांनी ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ उपक्रमाविषयी माहिती जाणून घेतली. महिलांसाठी ठिकठिकाणी दैनंदिन प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात