हिंदु धार्मिक परंपरा रक्षण अभियान अंतर्गत चला शनिशिंगणापूरला चळवळ
शनिशिंगणापूर : येत्या २६ जानेवारीला तथाकथित पुरो(अधो)गामी आणि नास्तिकवादी महिलांकडून श्री शनिदेवाच्या चौथर्यावर चढून तेथील शेकडो वर्षांची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याविरोधात येथील ग्रामस्थ, शनिभक्त महिला आणि हिंदुत्ववादी यांनी चांगलीच कंबर कसली आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून २ सहस्रांहून अधिक शनिभक्त महिला आणि हिंदुत्ववादी सहभागी होणार आहेत. धर्मपरंपरेचे रक्षण करणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे, याचे प्रथम दायित्व पोलीस आणि प्रशासन यांचेच असणार आहे; पण त्यांच्याकडून ते न झाल्यास ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत धर्मपरंपरांचे रक्षण करतील, असा निर्धारच शनिभक्त महिला आणि ग्रामस्थ यांनी केला आहे.
पोलिसांनी सध्या श्री शनिदेवाच्या चौथर्याला संरक्षण देण्यास आरंभ केला आहे. अनेक हिंदुत्ववादी आणि शनिभक्त महिला उत्स्फूर्तपणे २६ जानेवारी या दिवशी होणार्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी संपर्क करत आहेत. या आंदोलनाचा भाविक आणि पोलीस यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची संपूर्ण दक्षता घेण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. मुख्य म्हणजे आंदोलनाच्या वेळी पोलिसांना सहकार्य केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या आंदोलनाच्या दृष्टीने जनजागृती व्हावी आणि अभियानाचा प्रसार व्हावा, यासाठी संपूर्ण नगर जिल्ह्यात होर्डिंग आणि भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात