मोदी शासनाने विस्थापिताचे जीवन जगणार्या काश्मिरी हिंदूंची समस्या सोडवणे अपेक्षित आहे !
नवी देहली : स्वतंत्र भारतात राज्यकर्त्यांच्या बोटचेप्या धोरणांमुळे काश्मिरी हिंदू गेली अनेक वर्षे विस्थापिताचे जीवन जगत आहेत. त्यांना विस्थापित होऊन यंदा २६ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर काश्मिरी समिती देहलीच्या वतीने जंतर-मंतर येथे निषेध सभेचे आयोजन केले होते. या सभेला उपस्थित असणार्या हिंदुत्ववाद्यांनी आतापर्यंतच्या सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांसमवेतच केंद्रातील वर्तमान भाजप शासनाविषयीही संताप व्यक्त केला. या सभेत काश्मिरी समिती देहलीचे अध्यक्ष श्री. विजय रैना, पनून कश्मीरचे श्री. अजय च्रोंगु, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर आणि अन्य हिंदुत्ववादी उपस्थित होते. या निषेध सभेनंतर या परिसरातच एक निषेध फेरीही काढण्यात आली. त्यात आतंकवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
काश्मिरी समितीने शासनाकडे केलेल्या मागण्या !
१. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांना वंशविच्छेद मानण्यात यावे.
२. काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला उत्तरदायी असणार्या यासिन मलिक, बिट्टा कराटे यांना फाशी दिली जावी.
३. कलम ३७० काढून टाकण्यात यावे.
४. देशात विस्थापित म्हणून जगणार्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणून त्यांना काश्मीरमध्येच एक स्वतंत्र भाग होमलँड म्हणून देण्यात यावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात