धरणगुत्ती (जिल्हा कोल्हापूर) – येथे २२ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे यांचे ग्रामपंचायतीच्या सभागृहात मार्गदर्शन झाले. यात स्वसंरक्षणाचे महत्त्व, आजची स्त्रियांची स्थिती, धर्माचरणाची आवश्यकता यांचाही ऊहापोह करण्यात आला.
या वेळी सौ. शर्वरी रेपाळ आणि श्री. विपुल भोपळे यांनी दंडसाखळीचे प्रात्यक्षिक, तसेच मुलाने चाकूहल्ला केल्यास त्याचा प्रतिकार कसा करायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. याप्रसंगी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर प्रबोधन करून ध्वनीचित्र-चकतीही दाखवण्यात आली. गेल्या अडीच मासांपासून येथे मुलींसाठी प्रशिक्षणवर्ग आणि धर्मशिक्षणवर्ग चालू आहे.
वर्गामुळे धाडसीपणा वाढला ! – प्रशिक्षणवर्गातील युवतींचे अनुभवकथन
वर्गामुळे काय लाभ झाला, ते सांगतांना एक युवती म्हणाली, ‘स्वत:च्या गावातून जयसिंगपूर येथे जातांना काही मुले माझा पाठलाग करत होती. त्या वेळी मी धैर्याने त्या प्रसंगाला सामोरे जाऊन तो प्रसंग हाताळला. त्यामुळे मुले पळून गेली.’ बसस्थानकावर एका चक्कर आलेल्या महिलेवर उपचार केल्यावर ती शुद्धीवर आली. वर्गामुळे मुलींमध्ये धाडस निर्माण झाले, याची आम्हाला आवश्यकता होती, असेही युवतींनी सांगितले. (कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता समाजात धर्मशिक्षण देऊन, तसेच प्रथमोपचाराचे महत्त्व सांगून त्याप्रमाणे नवीन पिढी घडवणारी हिंदु जनजागृती समिती कुठे आणि सामाजिक कार्याचा आव आणून बुरखा पांघरून काम करणार्या तथाकथित सामाजिक आणि नास्तिक संघटना कुठे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
क्षणचित्रे
१. येथे वर्ग चालू करण्यासाठी शिरोळ तालुका ग्रामीण विभागाचे भाजप उपाध्यक्ष श्री. रमेश पाटील यांचे मोठे सहकार्य आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच ग्रामपंचायतीचे सभागृहही विनामूल्य मिळाले.
२. या वेळी कु. साक्षी सुतार या लहान मुलीने उत्स्फूर्तपणे ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम’, अशा घोषणा दिल्या, तर कु. अक्षदा पाटील आणि कु. साक्षी सुतार (वय १० वर्षे) यांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
३. मार्गदर्शन झाल्यावर मुलींनी लाठी-काठी शिकवण्याची सिद्धता दाखवली.
विशेष
अनुभव सांगतांना कु. अनुराधा माने म्हणाली, ‘‘या वर्गामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. याच समवेत माझी नेहरू युवा मंच तालुका सामाजिक उपक्रमासाठी मुलाखत होती. त्या मुलाखतीत मी सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्या स्वसंरक्षण आणि प्रथमोपचार या वर्गात सहभागी असते’, असे मी मुलाखतीत सांगितले.’’ (हा आहे हिंदु जनजागृती समितीवरचा समाजातील विश्वास ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात