Menu Close

हिंदु धर्मजागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहा ! – ह.भ.प. सद्गुरु एकनाथ लोमटे महाराज

मलकापूर, ता. कळंब (जिल्हा धाराशिव) येथे लोमटे महाराजांचे भक्तांना आवाहन !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने महाराजांची घेतली भेट

PSun03

मलकापूर ता. कळंब (जिल्हा धाराशिव) : बार्शी येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला भक्तांनी सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन येथील ह.भ.प. सद्गुरु एकनाथ लोमटे महाराज यांनी पौर्णिमेनिमित्त आलेल्या सहस्रो भक्तांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मजागृती सभेला आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रसारानिमित्त समितीचे श्री. तानाजी गोरे आणि सनातन संस्थेचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांनी ह.भ.प. लोमटे महाराजांची मलकापूर येथे भेट घेतली. त्या वेळी त्यांनी उपस्थित भक्तांंना आवाहन केले. या वेळी सनातनचे श्री. सांगोलकर यांनी महाराजांची भेट घेऊन सभा घेण्याचा उद्देश विशद केला. आणि हिंदु राष्ट्र का हवे ? हा ग्रंथ महाराजांना भेट दिला. या वेळी महाराजांनी सभेला आशीर्वाद दिले. तसेच सभेला उपस्थित रहाणाऱ्या मान्यवर वक्त्यांची नावेही उपस्थित भक्तांना सांगितली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *