Menu Close

राज्यकर्त्यांवर अवलंबून न रहाता हिंदूंनी वज्रमूठ करून हिंदु शक्ती दाखवावी ! – शशिधर जोशी, हिंदु जनजागृती समिती

लासलगांव (नाशिक) येथे हिंदु धर्मजागृती सभा

दीपप्रज्वलन करतांना कु. मृणाल जोशी, श्रीमती वैशाली कातकाडे, श्री. शशिधर जोशी

लासलगांव (नाशिक) – आज देशातच नव्हे, तर परदेशातही हिंदु धर्मावर टीका केली जातेे, देवदेवतांचे विडंबन केले जात आहे. हिंदु समाज निष्क्रीय राहिल्यामुळेच असे सर्वत्र घडत आहे. आता राज्यकर्त्यांवर अवलंबून न रहाता हिंदूंनी वज्रमूठ करून हिंदु शक्ती दाखवावी, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी केले. २५ मार्च या दिवशी येथील प.पू. भगरीबाबा मंदिर मैदान या ठिकाणी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या कालावधीत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत व्यासपिठावर सनातन संस्थेच्या कु. मृणाल जोशी आणि रणरागिणी शाखेच्या श्रीमती वैशाली कातकाडे उपस्थित होत्या. सभेला लासलगाव आणि परिसरातील ५०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुरोहित श्री. नीलेश अग्निहोत्री आणि दीपक कुलकर्णी यांनी वेदमंत्रपठण केले. या सभेचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी उगले यांनी केले. समितीच्या विश्‍वभरातील कार्याची ओळख श्री. तानाजी उगले यांनी करून दिली.

महिलांनी अत्याचाराविरुद्ध लढले पाहिजे ! – श्रीमती वैशाली कातकाडे, रणरागिणी शाखा

हिंदु धर्मामध्ये स्त्रियांना देवीस्वरूप बघितले जाते; मात्र मोगल काळापासून स्त्रियांना गुलाम बनवण्याचे कटकारस्थान उभे राहिल्याने आज महिला असुरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे आता महिलांनीच हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा अभ्यास करून त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांविरुद्ध लढले पाहिजे.

सनातन संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष वाढतच जाणार ! – कु. मृणाल जोशी, सनातन संस्था

पुरोगामित्व, सर्वधर्मसमभाव, नास्तिकतावाद या शब्दांच्या नावाखाली हिंदु धर्म आणि सनातन संस्था यांचा छळ करण्यात येत आहे. हिंंदु धर्माच्या विरोधात चालणार्‍या कटकारस्थानाच्या विरोधात सनातन संस्था प्राणपणाने उभी राहिल्यानेच सनातन संस्थेला खोट्या प्रकरणात अडकवून अपकीर्त करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे; मात्र असे असले, तरीही सनातन संस्थेच्या कार्याचा वटवृक्ष वाढतच जाणार आहे.

क्षणचित्रे

१. केवळ धर्मसभा ऐकण्यासाठी ८४ वर्षांचे श्री. पोफळेसर हे मालेगाव येथून आले होते.

२. ८० वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या आधुनिक वैद्या श्रीमती परांजपे याही धर्मसभेसाठी आवर्जून उपस्थित होत्या.

३. प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके व्यासपिठावरून करून दाखवण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *