हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशातील विविध भागांमध्ये शासनाला निवेदन सादर
हिंदु जनजागृती समितीची राष्ट्र्रध्वजाचा मान राखा चळवळ !
देहली : २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने होणारा राष्ट्र्रध्वजाचा अवमान थांबवण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्यापक प्रमाणात चळवळ राबवण्यात येते. या अनुषंगाने देशातील विविध भागांमध्ये शासनाला निवेदन देण्यात आले, तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. या चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राऊरकेला (ओडिशा) येथे प्रशासनाकडून चळवळीला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
गुडगाव (हरियाणा) येथील विद्यार्थ्यांकडून लोकांचे प्रबोधन करण्याचा निर्धार !
गुडगाव : राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंबंधी येथील विवेक मॉडल स्कूल, राव राम सिंह पब्लिक स्कूल, ऋषि पब्लिक स्कूल या ३ विद्यालयांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. विवेक मॉडल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी किमान १० लोकांचे प्रबोधन करण्याचा निर्धार केला.
तत्परतेने कार्यवाही करणार्या अधिकार्यांचे अभिनंदन !
आग्रा येथे अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडून पोलिसांना निर्देश
आग्रा : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी येथील अप्पर जिल्हाधिकार्यांच्या नावे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची त्वरित दखल घेऊन अप्पर जिल्हाधिकार्यांनी ते पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे पाठवले आहे, तसेच २६ जानेवारीला शहरात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती आणि त्याचा वापर करण्यावर प्रतिबंध करण्याचे निर्देश दिले आहेत.
तमिळनाडूमध्ये प्रवचन आणि निवेदन
कोलथूर (तमिळनाडू) : येथील वीर सावरकर शाळेत राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी प्रवचन घेतले. या प्रवचनाचा २५० विद्यार्थी आणि १५ शिक्षकांनी लाभ घेतला. यासंबंधी शाळेला भित्तीपत्रकेही देण्यात आली. समितीच्या कार्यकर्त्यांनी येथील चेन्नई विद्यालय आणि अन्य एका शाळेमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन सादर केले, तसेच राष्ट्रध्वजाच्या संदर्भात जागृतीपर भित्तीपत्रकेही दिली.