Menu Close

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

अकोला : येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात लोकशाहीचे अध:पतन रोखण्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शी करण्यात यावी, हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या मौलाना देहलवी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, कर्नाटक शासनाचा ‘पी.एच्.डी’ आणि ‘एम्.फिल्’ करणार्‍या अल्पसंख्यांक विद्यार्थांना मासिक २५ सहस्र रुपये शिष्यवृत्ती वेतन देण्याचा निर्णय रहित करावा, या मागण्या करण्यात आल्या. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे, तसेच धर्माभिमानी उपस्थित होते. उपस्थितांनी स्वाक्षर्‍या करून आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *