रावेर आणि जळगाव येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी
जळगाव : शहरातील महानगरपालिकेजवळ २५ मार्च या दिवशी, तसेच रावेर येथील पिपल्स बँकेजवळ शिवसेना, नागवेल युवा फाऊंडेशन, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. जळगाव येथील आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी आंदोलनातील मागण्यांचे विश्लेषण केले, तर श्री. शैलेश पोटे यांनी सूत्रसंचालन केले.
रावेर येथील आंदोलनात हिंदवी स्वराज्य सेनेचे श्री. योगेश पाटील म्हणाले, ‘‘प्रभु श्रीरामचंद्रांचे विडंबन आम्ही सहन करणार नाही. मौलाना देहलवींना तात्काळ अटक करावी अन्यथा हिंदवी स्वराज्य सेना उग्र आंदोलन करेल.’’
आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या
१. मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव श्रीफळ नेण्यास घालण्यात आलेली बंदी मागे घ्यावी.
२. आर्थिक प्रलोभने, बळजोरी आदी मार्गांनी होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करावा.
३. हिंदूंच्या देवता तसेच देशाचे पंतप्रधान यांच्याविषयी हेतूत: अवमानकारक वक्तव्ये करणार्या मौलाना देहलवी यांच्यावर कठोर कारवाई करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात