Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व विभागांना पत्र

  • हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळीचे यश ! 

  • राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करा !

सांगली : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते. त्याची नोंद घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये, यांसाठी सर्व शैक्षणिक संस्थांना सूचना द्याव्यात, तसेच आपल्या अखत्यारित येणार्‍या सर्व संस्थांना हा विषय कळवावा, असे पत्र सर्व विभागांना पाठवले आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावा, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. सदरचे पत्र सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आयुक्त, उपमुख्यकार्यकारी अधिकारी-जिल्हापरिषद, शिक्षणाधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना पाठवण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *