- इतकी वर्षे कायदा का करण्यात आला नाही, याचेही उत्तर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी दिले पाहिजे !
- शासनाने तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीही मद्य-मांस विक्रीवर बंदी आणावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : बिअर बार आणि मद्यालये यांना ‘जय अंबे’, ‘महाराणा प्रताप’ अशी हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांची नावे यापुढे देता येणार नाहीत. त्यांच्या नावाचा अपवापर थांबवणारा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात करण्यात येणार आहे, अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मद्याच्या दुकानांवरील महापुरुष आणि हिंदूंच्या देवता यांच्या नावांचे फलक तातडीने हटवण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी ३१ मार्च या दिवशी मांडली. (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शासनकाळात असे फलक का हटवण्यात आले नाहीत, याचेही उत्तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दिले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यावर उत्तर देतांना बावनकुळे यांनी वरील माहिती दिली.
बावनकुळे पुढे म्हणाले की, गुमास्ता आणि कामगार कायदा याअंतर्गत हा विषय येत असल्यामुळे तातडीने त्यावर बंधन आणू शकत नाही; परंतु कामगार, उत्पादन शुल्क आणि दोन्ही सदनांतील सदस्यांची बैठक घेण्यात येईल. यासमवेत विधी आणि न्याय विभागाचे मत घेऊन कायदा करण्यात येईल. या वेळी अन्य सदस्यांनी ‘‘डॉक्टर’ आणि ‘टीचर्स’ अशी नावे विदेशी मद्यांना देण्यावरही बंदी घालावी’, अशीही मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात