संभाजीनगर येथे श्रीरामनवमीला मिरवणुकीसाठी अनुमती मिळण्याचे प्रकरण
संभाजीनगर : येथील किराडपुरा भागातील संभाजीनगरचे ग्रामदैवत असणार्या श्रीराम मंदिराशी निगडित श्रीराम उत्सव समितीला श्रीरामनवमीला मिरवणूक काढण्याच्या संदर्भातील बैठक घेण्याचा आदेश संभाजीनगर उच्च न्यायालयाने येथील पोलीस उपायुक्तांना दिला आहे.
१. १ मार्च २०१७ ला श्रीराम उत्सव समितीने येथील पोलीस उपायुक्तांना श्रीरामनवमीच्या निमित्ताने मिरवणुकीची अनुमती मागितल्यावर त्यांनी ९ मार्चला मिरवणूक काढण्याची अनुमती दिली होती. या वेळी घालण्यात आलेल्या सर्व अटी समितीने मान्य केल्या होत्या; मात्र २३ मार्चला अचानक पोलिसांनी ही अनुमती नाकारली.
२. त्यानंतर श्रीराम उत्सव समितीने न्यायालयात फेरयाचिका दाखल करून विविध प्रसंगांमध्ये न्यायालयाने दिलेले निर्णय आणि मिळालेली अनुमती यांची उदाहरणे न्यायालयासमोर सादर केली.
३. यानंतर न्यायालयाने पोलीस उपायुक्तांना श्रीराम उत्सव समितीची अनुमती रहित करण्याऐवजी त्यांच्यासमवेत एकत्रित बैठक घेण्याचा आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ एप्रिलला आहे.
४. या प्रकरणी श्रीराम उत्सव समितीचे श्री. केतन फिरके यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची सुनावणी न्या. शिंदे आणि न्या. सोनावणे यांच्यासमोर झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात