इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा उद्दाम कारभार
आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालायचे कि नाही, ते वेळीच ठरवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जळगाव : तुमच्या मुलाची प्रगती समाधानकारक नसल्याने त्याला शाळेतून काढा, अन्यथा आम्ही त्याला अनुत्तीर्ण करू, असा अजब आदेश जळगाव येथील सेंट जोसेफ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना दिला आहे. याविषयी पालकांनी मुलांच्या उत्तरपत्रिका मागितल्या; पण शाळा प्रशासनाने त्या देण्यास नकार देत ‘जेवढे सांगितले, तेवढेच करा. उगीच वाद घालू नका,’ असेही म्हटले आहे. (मनमानी आणि अरेरावी करणारे शाळा प्रशासन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत.
काही पालकांनी सांगितले की, नवीन नोंदणीतून शाळा प्रशासनाला लक्षावधी रुपये डोनेशन स्वरूपात मिळणार आहेत. त्यामुळे असा प्रकार केला जात आहे. याअगोदरही ‘मुलांना शाळेतील शिक्षकांकडेच शिकवणी लावा, अन्यथा अनुत्तीर्ण केले जाईल’, अशीही धमकी दिली होती. (पैशांच्या लोभापोटी अशा धमक्या देणारी शाळा विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
यासंदर्भात माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री. देवीदास महाजन म्हणाले, ‘‘शाळा प्रशासनाला असे करता येणार नाही. शासनाने त्यांना अनुमती देतांना काही अटी घातल्या आहेत. त्या त्यांना भंग करता येणार नाहीत. अन्यथा अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल.’’
खाजगी शाळा चालकाकडूनही पालकांची लूट
काही शाळांकडून ४० सहस्र ते ६० सहस्र रुपयांची मागणी देणगी (डोनेशन) स्वरूपात करण्यात येत आहे, तर काही शाळा २५ सहस्र ते ३० सहस्र रुपयांची मागणी करत आहेत. याप्रकरणी प्रशासन अनभिज्ञ आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी बी.जे. पाटील म्हणाले, ‘‘विना अनुदानित शाळांचे शुल्क शाळा प्रशासन ठरवते आणि अनुदानित शाळांचे शुल्क पालक आणि शिक्षक संघ ठरवतात.’’ (असे आहे, तर मग अशा नर्सरींना शासनाकडून नियमावली का दिली जात नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
शासनाचे नियम ढाब्यावर बसवणार्या सेंट जोसेफला शिक्षणाधिकार्यांनी फटकारले !
धिकारी श्री. देविदास महाजन यांनी शाळेला भेट देत कायदेशीर नोटीस बजावत अप्रगत विद्यार्थ्यांसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा करत मुख्याध्यापकांना खडसावले. विद्यार्थ्यांवर अन्याय करणार्या व्यक्तीवर कायदेशीररित्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस देत खुलासा करण्याचे आदेश नेण्यात आले आहेत.
तसेच मुख्याध्यापक पदास शिक्षणविभागाची मान्यता लागते; पण हा नियमही धाब्यावर बसवून मान्यता न घेता अवैधपणे अलका डिसूजा ह्या मुख्याध्यापकपदी आहेत, याचीही नोटीशीत जाणीव करून देण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात