पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाजवळच्या मसाई पठारावर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे सर्व नियम धाब्यावर बसवून पद्मावती चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. या पठारावर १५ मार्च २०१७ या दिवशी चित्रीकरण्याच्या कालावधीत आग लागून कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचे कळते. मसाईचे पठार येथे वन्यजीव आणि वैविध्यता असणार्या वनस्पतींचा प्रदेश आहे. यातील अनेक वन्यजीव आणि वनस्पती दुर्मिळ आहेत. आगीत वन्यजीव आणि वनस्पती जळून गेल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे चित्रीकरण अवैधरित्या झाले असू शकते. त्यामुळे या प्रकरणी अवैधरित्या चित्रीकरण करणार्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पन्हाळा येथील तहसीलदार श्री. रामचंद्र चौबे यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, तसेच अन्य उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात