Menu Close

चीनने मुसलमानबहुल झिनझियांगमध्ये बुरखा आणि दाढी यांवर बंदी घातली

धर्मांधांवर वचक बसवणार्‍या चीनकडून भारत काही शिकेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

बीजिंग : चीनच्या मुसलमानबहुल झिनझियांग प्रांतातील जिहाद्यांचा प्रभाव न्यून करण्यासाठी विचित्र पद्धतीने वाढवलेली दाढी आणि सार्वजनिक बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

१. झिनझियांग सरकारच्या १ एप्रिलपासून लागू होणार्‍या नव्या नियमावलीनुसार चेहर्‍यासहित सर्वांग झाकणारा पोषाख करणार्‍या नागरिकांंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

२. विवाह कायदेशीर पद्धतीने न करता धार्मिक पद्धतीने करणे, हलालच्या नावाखाली इतरांच्या धर्मनिरपेक्ष आयुष्यात दखल देणे, रेडिओ, टीव्ही वा अन्य सार्वजनिक सुविधा नाकारणे अशा गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.

३. लहान मुलांनाही सर्वसामान्य शाळांत न घालता धार्मिक शिक्षण देणार्‍या शाळांमध्ये घालण्यासही मनाई करण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *