सांगली : येथे पलूस, कुंडल, मिरज, सांगली, ईश्वरपूर यांसह जयसिंगपूर येथे उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांनी ‘आम्हाला गुढी उभारण्यामागचे शास्त्र समजले. यातून आनंद मिळाला आणि यापुढे आम्ही याचप्रकारे धर्मशास्त्रीय पद्धतीने गुढी उभारू’, असे सांगितले.
मिरज
येथे शिवसेनेचे श्री. आनंद राजपूत यांच्या घरी गुढीपूजन करण्यात आले. या वेळी धर्मसत्संगातील धर्माभिमानी, वाचक, तसेच अन्य असे १८ जण उपस्थित होते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध रहाण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.
पलूस
येथील प.पू. धोंडीराज महाराज यांच्या मंदिरात सामूहिक गुढीचे पूजन श्री. गणेश मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. तासगाव तालुक्यातील कौलगे येथे मारुति मंदिरातील सामूहिक गुढीचे पूजन पुजारी श्री. अजिंक्य गुरव यांनी केले. या वेळी सरपंच श्री. बाबासाहेब पाटील यांच्यासह धर्मशिक्षण वर्गातील ३० हून अधिक जण उपस्थित होते.
कुंडल येथे सामूहिक गुढीपूजन हिंदु धर्माभिमानी आणि दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. वसंत धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी, धर्माभिमानी, महिला असे २५ जण उपस्थित होते. सर्वांनी ‘सनातन धर्माचा विजय असो’, अशा घोषणा दिल्या.
ईश्वरपूर
ईश्वरपूर येथील यल्लमा चौक येथे श्री. चंद्रकांत पेठकर आणि श्री रेणुका माता मंदिराचे विश्वस्त श्री. भगवानराव तुळसणकर यांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे श्री. शेवाळे, मंदिराचे पुजारी श्री. तानाजी घोरपडे, सौ. रोहिणी पेठकर, सौ. सीमा जयकर पाटील, सौ. शेवाळे, हिंदु धर्माभिमी श्री. विश्वजीत जयकर पाटील उपस्थित होते. याच शहरात प.पू. धोंडीराम महाराज मंदिर येथे श्री. यशवंत पाटील आणि श्री. प्रकाश पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य श्री. सुभाष पाटील, तसेच १५ हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
तुजारपूर येथे धर्माभिमानी आणि भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री. आत्माराम निकम यांच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. या वेळी तानाजी बाबर, सौ. अलका बाबर यांसह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. बोरगाव येथे सरपंच श्री. प्रकाश वाटेगावकर यांसह धर्माभिमानी उपस्थित होते. शिराळा येथे गुरुजी श्री. विलास कुलकर्णी यांनी गुढीचे पूजन करण्यात आले. येथे श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. राजेंद्र खुर्द, संतोष परीट, प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या वंदना नलवडे, दैनिक जनप्रवासचे वार्ताहर रवि कदम, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री अशोक मस्कर, बाळासाहेब वाघ, सचिन सोनटक्के, प्रशांत हसबनीस, दिनकर गोसावी, प्रशांत हसबनीस, पार्थ जोशी उपस्थित होते.
जयसिंगपूर येथे धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांनी सामूहिक गुढीपूजनाची सिद्धता केली होती. वडर समाजाचे प्रमुख श्री. आनंदा भोसले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कु. भूषण सुतार (इयत्ता ६ वी) याने आसपासच्या घरात जाऊन गुढीची प्रार्थना सांगितली.
विश्रामबाग येथे श्री. प्रदीप सामंत यांच्या घरी शास्त्रानुसार गुढीपूजन करण्यात आले. या वेळी गोल्ला समाजाचे अध्यक्ष श्री. सचिन पवार यांच्यासह १० जण उपस्थित होते.
कवठेमहांकाळ येथे हिंदुत्वनिष्ठांकडून स्वागत फेरी आणि सामूहिक गुढी !
कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) : येथे हिंदुत्वनिष्ठांकडून सामूहिक गुढी उभारणी आणि स्वागत फेरी काढण्यात आली. ‘जगदंब प्रतिष्ठान’ यांनी ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्ये वाजवली. मंदिराचे पुजारी श्री. अंबादास गुरव यांच्या हस्ते गुढीची पूजा करण्यात आली. गुढीचे पूजन झाल्यावर शिवप्रतिष्ठानच्या वतीने प्रेरणामंत्र म्हणण्यात आला.
या वेळी गजदंब प्रतिष्ठानचे श्री. अमित जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. दीपक गुप्ता, श्री. राजू गोरे, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. अनिल पाटील, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. वैभव कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रसाद कमलाकर, श्री. महादेव कोळी यांसह १२५ हून अधिक हिंदू सहभागी झाले होते.
विशेष
१. श्री. अभिजित हजारे यांनी अल्पदरात वाहन उपलब्ध करून दिले.
२. अनेकांनी ‘फेरी अत्यंत शिस्तबद्ध आणि परिणामकारक झाली’, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात