हिंदु जनजागृती समितीच्या हिंदी ‘अॅन्ड्राईड ऍप्लीकेशन’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन !
भगवंत हवा असेल, तर गांडीव आणि गदा धारण करा ! – तपन घोष
अमेरिकेसारख्या प्रगत देशातही शस्त्र बाळगण्यास मुभा आहे, तर भारतात प्रतिबंध का ? पाप आणि अधर्म नष्टच करायला हवे. रामायणातही लंकादहनाला महर्षि वाल्मिकी आणि संत तुलसीदास यांनी ‘सुंदरकांड’ म्हटले आहे. देवाला धर्मसंस्थापना करण्यासाठी अर्जूनाप्रमाणे गांडीव आणि हनुमानाप्रमाणे गदाधारी भक्तांची आवश्यकता आहे. अधर्माच्या विरूद्ध काळानुसार आवश्यक गांडीव आणि गदा धारण करा, राम तुम्हाला मिळाल्याशिवाय रहाणार नाही, असे प्रतिपादन बंगाल येथील हिंदु समहतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. तपन घोष यांनी केले. ते येथील सिविक सेंटर येथे हिंदु सेवा परिषदेच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सभेत बोलत होते. सभेपूर्वी शहरातून भव्य गदा यात्रा काढण्यात आली. या वेळी ५००० हून अधिक हिंदू उपस्थित होते.
श्री. घोष पुढे म्हणाले की, भारत हिंदूंची धर्मभूमी, पुण्यभूमी आणि मोक्षभूमी आहे. हा काही बगीचा नाही की, कोणीही यावे आणि येथील फळे खाऊन जावी. मुसलमानांना जर भारतात रहायचे असेल, तर त्यांनी ‘वन्दे मातरम्’ म्हणायलाच हवे. जो या भूमीला आई मानतो, त्यालाच इथे रहाण्याचा अधिकार आहे. कृष्णाला मारण्यासाठी आईच्या रूपात पुतना आली होती. आजचे मिशनरी म्हणजे सेवेच्या नावाखाली धर्मांतर करणारे राक्षसच आहे. अशा राक्षसांविषयी सतर्क राहून युवकांनी लढा दिला पाहिजे. आज ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडिया टुडे’, यांच्यासारखी इंग्रजी नियतकालिके काही देशाचा आवाज नाही. यातून सातत्याने निधर्मीवादाचा ढोल बडवला जातो. या निधर्मीवाद्यांच्या ढोल नगार्यांपेक्षा आपला हा आवाज आत बुलंद व्हायला हवा. त्यासाठी हिंदु राष्ट्र आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
आता हिंदूंसमोर छुप्या युद्धाचे आव्हान ! – पू. डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे म्हणाले की, वारंवार होणारे रेल्वे अपघात, जबलपूर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीतील दुर्घटना, यांतून जिहाद्यांचे छुपे युद्ध चालू आहे. कानपूर रेल्वे अपघातातील इसिसचा हात असल्याचे आणि त्याची पाळेमुळे मध्यप्रदेशात सापडल्याचे आता उघड आहे. प्रत्यक्ष समोर येणार्या शत्रूशी तर आपण लढू शकतो; पण जे लपून आपल्यावर वार करण्याचा प्रयत्न करणार्यांना रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. अशा जिहाद्यांची माहिती पोलिसांना देऊन त्यांना जन्नतमध्ये पाठवण्यासाठी सहकार्य करा. आम्ही जर संघटित झालो, तर प्रत्येक राजकीय पक्षाला आपले ऐकावे लागेल, हे उत्तरप्रदेश निवडणुकांच्या निमित्ताने स्पष्ट झाले.
हिंदु सेवा परिषदेने निर्माण केला संघटनाचा आदर्श !
पू. डॉ. पिंगळे म्हणाले की, ५ वर्षांत हिंदु सेवा परिषदेने इतक्या मोठ्या प्रमाणावर युवकांचे संघटन करून एक आदर्श निर्माण केला आहे. आता या सभेला आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे दायित्व आहे की, न्यूनतम १० कार्यकर्त्यांपर्यंत ही जागृती पोहोचवून संघटनेला १० पटीने पुढे घेऊन जायला हवे.
हिंदु धर्माकडे वाकड्या दृष्टीने बघणार्यांना दहशत बसेल, असे उत्तर द्या ! – अतुल जेसवानी, अध्यक्ष, हिंदु सेवा परिषद
भारतातून पाकिस्तान जेव्हा वेगळा झाला, तेव्हा हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले गेले. आज भारताची स्थिती बघता पुन्हा हिन्दूवर ही स्थिती येऊ नये, यासाठी हा इतिहास आपण विसरता कामा नये. यासाठी राजनीती नाही, तर आपल्याला धर्मनीती ने काम घ्यावे लागेल. स्वरक्षणासाठी प्रत्येकाने शस्त्र हाती धरावे. आम्ही जर एका बोटाने मत देऊन उत्तरप्रदेशात सत्ता परिवर्तन करू शकतो, तर त्याच हाताने आम्ही धर्माचे रक्षणही करू शकतो. जो हिंदु धर्माकडे वाकड्या दृष्टीने बघेल, त्याला दहशत बसेल, असे उत्तर आता दिले जाईल. हिंदु तरुणांनी आता झालेल्या अन्यायासाठी रडत न बसता, त्याचा प्रतिकार करावा. त्यासाठी त्याला लागणारे सहकार्य आम्ही करू.
गौरक्षणाची चर्चा करणे जातीयवादी कसे ? – निखिल कनौजिया
हिंदु सेवा परिषदेचे महानगर अध्यक्ष निखिल कनौजिया म्हणाले, या देशात प्राण्यांच्या अधिकाराची चर्चा होते, तेव्हा ते सेक्यूलर असतात; पण जेव्हा आम्ही गोरक्षणाची चर्चा करतो, तेव्हा आम्ही जातीयवादी कसे ठरतो ? संरक्षणासाठी कायद्यानी शस्त्र बाळगू शकतो.
पाश्चात्त्य संस्कृतीत वाह्यातपणा सोडून काय आहे ? – प.पू. डॉ. स्वामी मुकुंददास महाराज
या वेळी परिषदेचे मार्गदर्शक श्री गुप्तेश्वर पिठाधिश्वर प.पू. डॉ. स्वामी मुकुंददास महाराज म्हणाले की, आज खरे संकट जिहादी आतकंवादी आणि देशविरोधी घटकांनी चालवलेल्या अंतर्गत युद्धाचे आहे. हे संकट व्यापार, शिक्षण, विदेशी संस्कृतीचा प्रसार यांसारख्या कित्येक क्षेत्रातून डोके वर काढत आहे. आज भारतियांना अक्कल न वापरता नक्कल करण्याची सवय झाली आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या आचरणातून काय मिळते ? वाह्यातपणा सोडून त्यात दुसरे काय आहे ? हिंदूंच्या प्रत्येक सणामध्ये ज्ञान, भक्ती आणि समृद्धी यांचा संगम आहे. सणांच्या दिवशी व्रत, पूजा करून उर्जा प्राप्त केली जाते, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत. संस्कृतमधील ‘सप्तम’ या शब्दावरून सप्टेंबर, ‘अष्टम’ वरून ऑक्टोबर आणि ‘दशम’ वरून डिसेंबर, अशी महिन्यांची नावे पडली; पण प्रत्यक्षात डिसेंबर बारावा महिना का आहे, याचे उत्तर विदेशी विद्वानांनी द्यायला हवे. अशा प्रकारे आपण विदेशी संस्कृतीचा अभ्यास केला, तर त्यातील फोलपणा आपल्या लक्षात येईल.
क्षणचित्र
१. या वेळी काढण्यात आलेल्या गदायात्रेतील डॉल्बींवर पोलिसांनी कारवाई करून जप्त केले.
२. सभास्थळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारक आणि हिंदु राष्ट्र याविषयीची प्रदर्शनी लावण्यात आली होती. त्याचा अनेकांनी लाभ घेतला.
हिंदु जनजागृती समितीच्या हिंदी ‘अॅन्ड्राईड ऍप्लीकेशन’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘अॅन्ड्राईड ऍप्लीकेशन’ हिंदी, इंग्रजी आणि मराठी या भाषांमध्ये ‘प्ले स्टोअर’वर विनामूल्य उपलब्ध आहे. या ऍप्लीकेशनमध्ये हिंदूंचा गौरवशाली इतिहास, धर्मशिक्षण, देश-विदेशातील हिंदूंच्या संदर्भातील घटना, धर्मरक्षणासाठी लढणार्यांना आवश्यक कायदेशीर माहिती यांसह अन्य पुष्कळ माहिती उपलब्ध असून प्रत्येक हिंदूने हे ‘डाउनलोड’ करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने या वेळी करण्यात आले.