- आज महाविद्यालयात अराजक माजवणार्या धर्मांध विद्यार्थ्यांवर शासनाने आताच कठोर कारवाई न केल्यास उद्या ते मोठे झाल्यावर देशभरात अराजक माजवतील !
- आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी धर्मांधांचे अतीलांगूलचालन केल्याचाच हा परिणाम आहे !
- धर्मांधांच्या अशा आक्रमणांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याला पर्याय नाही !
जळगाव : येथील नूतन मराठा महाविद्यालयात दहावीची परीक्षा चालू असतांना अँग्लो ऊर्दू हायस्कूलमधील १५० हून अधिक धर्मांध विद्यार्थ्यांनी क्षुल्लक कारणावरून धुडगूस घालत बसण्याचे बाक (बेंच) तोडले, तसेच लोखंडी सळईने अन्य विद्यार्थ्यांना मारहाणही केली. त्यानंतर परिसरात दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. (परीक्षा चालू असतांना महाविद्यालयासारख्या ठिकाणी धर्मांध मोठ्या प्रमाणात जमून दंगल करतात, एवढी त्यांची मजल गेली आहे. शासन धर्मांधांवर वचक ठेवत नसल्यानेच ते हिंदूंचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे विविध मार्ग अवलंबण्याचे धाडस करतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या हाणामारीत दोन हिंदु विद्यार्थी पुष्कळ घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
धर्मांधांनी केलेल्या या दंगलीमुळे सहाजिकच येथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रचंड तणावाखाली परीक्षा दिली. (उद्या या विद्यार्थ्यांना अल्प गुण पडले किंवा ते अनुत्तीर्ण झाले, तर त्याला उत्तरदायी कोण ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
दगडफेकीमुळे परिसरात पळापळ झाल्याने त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला. एवढी मोठी घटना घडूनही कुणाच्याही विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आलेला नाही. केवळ २ धर्मांधांना समज देऊन सोडण्यात आले. (धर्मांधांना अशाप्रकारे पाठीशी घातले जात असल्यामुळेच त्यांचा उद्दामपणा वाढत आहे. हे थांबण्यासाठी प्रभावी संघटन करावे, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात