छत्तीसगड येथे भाजपची सत्ता असतांना हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कोरबा (छत्तीसगड) : येथे संतोष नावाच्या एका हिंदु व्यक्तीच्या घरी ख्रिस्ती मिशनर्यांकडून प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भोजराम देवांगन् आणि दिनेश भात्रा या स्वयंसेवकांनी ‘धर्मांतराचा प्रयत्न करण्यात येत आहे’, असे सांगत विरोध केला. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी संघाच्या या कार्यकर्त्यांना बलपूर्वक पोलीस चौकीत नेले. त्यामुळे संतापलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस चौकीबाहेर आंदोलन केले. या संदर्भात येथील पंप हाऊसजवळील चर्चचे पास्टर ऐसू यांनी म्हटले की, येथे आम्ही धर्मांतरासाठी नव्हे, तर आजारी व्यक्ती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यासाठी आलो होतो. (आजारी व्यक्तीला बरे करण्याच्या नावाखालीच ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतर अधिक प्रमाणात केले जाते, हेच वेळोवेळी उघड झाले आहे! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात