श्रीक्षेत्र आळंदी : स्वानंद सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दीपूर्ती महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २९ मार्चला काल्याचे कीर्तन पार पडले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीने प्रकाशित केलेल्या ‘प्राथमिक उपचार प्रशिक्षण भाग १, भाग २ आणि भाग ३’ या हिंदी भाषेतील ३ ग्रंथांचे वारकरी शिक्षण संस्थेचे शांतिब्रह्म गुरुवर्य मारुति महाराज कुर्हेकर, म. मं. स्वामी गिरिधर गिरिजी महाराज (छोटे महाराजजी), हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
येणार्या आपत्काळात, तसेच इतर वेळीही प्रथमोपचाराची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. समितीचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे आणि डॉ. दुर्गेश सामंत यांनी या ग्रंथांचे संकलन केले आहे. आपत्काळात व्याधींनी ग्रस्त झाल्यावर, अपघात झाल्यावर, संकटात सापडल्यावर वैद्यांचे उपचार मिळणे, औषधे मिळणे कदाचित कठीण होऊ शकते. आगामी आपत्काळासाठी संजीवनी ठरणारी ही ग्रंथमाला म्हणूनच प्रकाशित करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात