कुर्ला येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात येणार्या मिरवणुकीचे प्रकरण
- श्रीरामाच्या मिरवणुकीला अनुमती नाकारायला हा काय पाकिस्तान आहे का ?
- ट्रॉम्बे पोलीस ठाण्यावर आक्रमण करून कायदा-सुव्यवस्थेला धाब्यावर बसवणार्या धर्मांधांपुढे नमणारे आणि हिंदूंना मात्र मिरवणुकीसाठी अनुमती नाकारणारे पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कुर्ला : येथे श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदु परिषदेच्या वतीने काढण्यात येणार्या मिरवणुकीला कायदा-सुव्यवस्थेचे कारण देऊन पोलिसांनी अनुमती नाकारली होती. त्यानंतर विश्व हिंदु परिषदेचे क्षेत्रीयमंत्री शंकर गायकर आणि कोकण प्रांताध्यक्ष यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांमुळे ही अनुमती परत देण्यात आली. पोलिसांनी अनुमती नाकारल्यानंतर याच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी ट्विटरवर ट्रेंड चालू केला होता. ‘गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या मिरवणुकीच्या परंपरेला या वर्षी का हरकत घेतली जात आहे’, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला होता, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना याविषयी सहकार्य करण्याची विनंती केली होती. (बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात स्वत:चे सण साजरे करण्यासाठी हिंदूंना एवढा संघर्ष करावा लागतो, हे अतिशय दुर्दैवी आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याविना पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
भाजपच्या खासदार पूनम महाजन यांचे यासाठी सहकार्य लाभले. काँग्रेसचे खासदार नसीम खान यांच्या दबावामुळे आरंभी अनुमती नाकारली होती, अशी चर्चा येथे चालू होती. कुर्ला येथे प्रत्येक वेळी हिंदूंचे सण साजरे करण्यासाठी अनुमती मिळण्यात अडचणी येतात, अशीही चर्चा स्थानिक नागरिकांत होती. (हिंदूंनो, धर्मांधांची संख्या जिथे वाढते, तिथे काय होते, ते लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात