‘भोंदूगिरीच्या विरोधात कायदा असतांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कशासाठी’, असा प्रश्न एकाही राजकारण्याला कधी का पडला नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कल्याण : भाजपला या देशातील सत्ता हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी हा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो. देशाची संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवे. लोकशाही दुबळी करण्याचे काम भाजप सरकार करत आहे. गोहत्येचा कायदा असतांना जन्मठेपेचा नवीन कायदा कशासाठी ? लोकांमध्ये जरब बसवण्याचा प्रयत्न असून सरकारची ही नीती आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘सत्ता आल्यावर सामाजिक ऐक्य ठेवण्याची काळजी घेतली न गेल्यास उत्तरप्रदेशच नव्हे, तर देशावर परिणाम होईल. योगी आदित्यनाथ यांची अल्पसंख्यांकांविषयीची भाषणे ऐकल्यावर मला धक्का बसायचा. (ओवैसी यांनी १५ मिनिटांत १०० कोटी हिंदूंना संपवण्याच्या केलेल्या भाषणाचा कधी कुठल्या राजकारण्यांना धक्का बसल्याचे ऐकिवात आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अशा लोकांच्या हाती सत्ता गेल्याने चिंतेचे वातावरण आहे.’’ (योगी आदित्यनाथ यांच्या निवडीला मूठभर हिंदुद्वेषी पुरोगामी वगळता कोणीही विरोध केलेला नाही. उलट उत्तरप्रदेशातीलच नव्हे, तर देशभरातील जनतेने त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात