जबलपूर (मध्यप्रदेश) : येथे १ एप्रिल या दिवशी ‘हिंदु सेवा परिषदे’कडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु संहतीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. तपन घोष, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु सेवा परिषदेचे अध्यक्ष श्री. अतुल जेसवानी आणि महानगर अध्यक्ष श्री. निखिल कनौजिया उपस्थित होते. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. तपन घोष यांनी उत्तरे देतांना मांडलेली सूत्रे पुढे देत आहोत.
हिंदूंचे पुनर्वसन करण्याचे आव्हान संघ आणि भाजप यांनी आतापर्यंत स्वीकारलेले नाही, हे दुःखद !
केवळ सरकार जनतेत पालट करू शकत नाही. पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा परिचय सामाजिक संस्था असाच होता; मात्र आता तो भाजपपर्यंत सीमित राहिला आहे. त्यापेक्षा सर्व पक्षांमध्ये हिंदुत्वाचा विचार होईल, यासाठी संघाने प्रयत्न करायला हवेत. हिंदु सशक्त व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, असाच संघाचा विचार आहे; मात्र प्रत्यक्षात ते करण्यात तो तोकडा ठरत आहे. काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्वसन करण्याचे आव्हान संघ आणि भाजप यांनी आतापर्यंत स्वीकारलेले नाही, हे दुःखद आहे.
बंगालमध्ये जिहाद्यांचे षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही !
बंगालमध्ये इस्लामचा विस्तार आणि अत्याचार यांत वाढ होत आहे. हे गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासूनचे षड्यंत्र आहे. याच षड्यंत्रामुळे देशाची फाळणी झाली आणि १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंना हाकलून लावण्यात आले. बंगालमध्ये हीच स्थिती येणार आहे; मात्र आम्ही ते होऊ देणार नाही.
हिंदु संहतीद्वारे बंगालमध्ये होत असलेले कार्य !
बंगालमध्ये ३८ सहस्र गाव आहेत. यातील २० सहस्र गावांत हिंदु आणि मुसलमान एकत्र रहातात. प्रतिदिन कोणत्या ना कोणत्या कारणावरून दंगली घडवल्या जातात. बंगालमध्ये प्रतिदिन १०० दंगली होत आहेत आणि ५० हिंदु मुली लव्ह जिहादच्या बळी ठरत आहेत. हिंदु संहती यात हिंदु तरुण-तरुणी यांना साहाय्य करत आहे. येथील हिंदूंना जिहादच्या विरोधात लढण्यासाठी सिद्ध करत आहोत.
आमचे युद्ध जिहाद्यांशी !
देशात कोठेही बांगलादेशी घुसखोर सापडल्यास आम्हाला त्याचे ओळखपत्र, आधार कार्ड आणि छायाचित्र पाठवा. नक्कीच त्याचा पत्ता बंगालमधला असू शकतो. आम्ही त्या पत्त्यावर जाऊन त्याची सत्यता पडताळून पाहू आणि प्रशासनाला त्याच्यावर कारवाई करण्यास सांगू. आपल्याला लक्षात घ्यायला हवे की, बांगलादेशी घुसखोर असोत कि धर्मांध मुसलमान यांत काहीच अंतर नाही. आपले युद्ध जिहादसाठी काम करणार्या सर्वांशी आहे.
हिंदूंवर होणार्या अत्याचाराची प्रतिक्रिया संपूर्ण देशात उमटली पाहिजे !
उत्तरप्रदेशमधील हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांच्या विधानावरून बंगालमधील मुसलमान रस्त्यावर उतरले आणि हिंसाचार केला. यातून मुसलमान संघटित आहेत, हे लक्षात येते. त्याचप्रमाणे भारतात हिंदूंवर कुठेही अत्याचार झाला, तर देशभरातील हिंदूंनी त्याच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. मुसलमान त्यांच्या धर्मबंधूंविषयी जागृत असतात, तसे हिंदूंनी असले पाहिजे. देशात एखाद्या ठिकाणी धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण झाल्यास अन्यत्रच्या हिंदूंनी स्थानिक धर्मांधांना याचा जाब विचारला पाहिजे.
जम्मूमध्ये रोहिंग्या मुसलमान राहु शकतात, तर हिंदू का नाही ?
जम्मूमध्ये भाजप सरकारने कलम ३७० चे उल्लंघन करून म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना वसवले आहे. याचा आम्ही विरोध करत आहोत. जर मुसलमान तेथे राहु शकतात, तर हिंदू का नाही ? सरकारने आम्हाला वचन द्यावे की, ते काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण करणार अन्यथा आम्ही त्यांच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये जाऊ.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात