पुणे : शहरात होणाऱ्यां देशद्रोही आणि हिंदुत्वविरोधी कारवायांना चाप लावण्यासाठी २ एप्रिल या दिवशी कर्वेनगर भागातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. ‘संघटन हीच शक्ती’ या घोषवाक्यानुसार धर्मांतर, हिंदुविरोधी प्रक्षोभक भाषणे, धर्माशिक्षणाविषयीची उदासीनता आदी प्रमुख समस्यांच्या विरोधात एकत्रितपणे कार्य करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे, तसेच राजे शिवराय प्रतिष्ठानचे श्री. महेश पवळे यांनी मार्गदर्शन केले. हिंदु धर्मावर होणाऱ्यां आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव पर्याय असल्याचे श्री. आगवणे यांनी सांगितले. श्री. पवळे यांनी ‘गडकोट मोहिमेद्वारे गडकोटांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, तसेच गोहत्या, धर्मांतर रोखण्यासाठी कृतीशील व्हावे’, असे आवाहन केले.या प्रसंगी उपस्थित ५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी कृतीशील होण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात