श्रीरामनवमीला पोलिसांनी उत्सव साजरा करण्यास अडवणूक केल्याचे प्रकरण !
चिंचवड : पोलिसांनी अडवणूक केल्यामुळे काळेवाडी येथे ग्रामस्थांना रामनवमीच्या दिवशी रामनवमीचा उत्सव साजरा करता आला नव्हता. हिंदू संघटित झाल्यावर पोलिसांनी अखेर दुसऱ्या दिवशी उत्सव साजरा करण्यास अनुमती दिली होती. त्यानुसार येथील भारतमाता चौकात दुपारी १२ वाजता ग्रामस्थांनी रामनवमी उत्सव साजरा केला. या वेळी प्रभु श्रीरामचंद्रांची आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. समस्त हिंदु आघाडीचे श्री. मिलिंद एकबोटे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्वश्री तुषार पाटील, रवी महाडिक, संग्राम जाधव, नीलेश खटके यांचा आयोजनात पुढाकार होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
५ एप्रिल २०१७
काळेवाडी (पुणे) : श्रीरामनवमी साजरी करण्यास पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांना आडकाठी
- रामभक्त हिंदूंवर गुन्हे प्रविष्ट करण्याची पोलिसांकडून धमकी !
- श्रीरामनवमीचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वीच हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेतले !
- हिंदूंच्या संघटनामुळे अखेर दुसर्या दिवशी श्रीरामनवमी साजरी करण्यास अनुमती !
वाकड (जिल्हा पुणे) पोलिसांची मोगलाई ! असे पोलीस रामाचे वंशज कि रावणाचे ? हिंदुबहुल देशात हिंदूंच्याच उत्सवांना आडकाठी आणली जाते, हे संतापजनक आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी केल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
चिंचवड : काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने ४ एप्रिल या दिवशी श्रीरामनवमीनिमित्त काळेवाडी येथील भारतमाता चौकात श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार होता. दुपारी १२ वाजता रामजन्म साजरा करून रामाचा पाळणा म्हणणे, महिलांचे स्तोत्रपठण, श्रीरामाचे पूजन आणि अन्नदान असे कार्यक्रमाचे स्वरूप होते; मात्र त्याआधीच सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्यांनी कार्यक्रमस्थळी येऊन श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यास प्रतिबंध केला. जवळच मुसलमानांची वस्ती असल्याने पोलिसांनी कार्यक्रमाचे ठिकाण पालटण्याविषयी हिंदुत्वनिष्ठांवर दबाव टाकला. शेवटी सर्वश्री अभिजीत शिंदे, कुणाल साठे, मंगेश नढे, रवींद्र महाडिक आदी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्याची धमकी दिली. (असे पोलीस धर्मांधांच्या संदर्भात करतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. या संदर्भात श्री. अभिजीत शिंदे म्हणाले, ‘‘भारतमाता चौकात प्रत्येक मासातून एकदा सामूहिक ‘शिववंदना’ घेण्यात येते, तसेच त्या ठिकाणी गेली ४ वर्षे श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे; मात्र पोलिसांकडून या कार्यक्रमांना आडकाठी करण्यात येत आहे. यंदा त्या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त कार्यक्रम घेण्यासही पोलिसांनी अनुमती दिली नव्हती. आताही पोलिसांनी कार्यक्रम दुसर्या ठिकाणी घेण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला, तसेच ‘आमचे ‘करियर’ (भवितव्य) खराब केले जाईल’, अशी धमकीही दिली.’’
२. उत्सवासाठी घालण्यात आलेला मांडव, तसेच रामाचा पाळणा काढण्यास पोलिसांनी आयोजकांना भाग पाडले. (असे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. आयोजक महिलांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन ‘भारतमाता चौकात टिपू सुलतान जयंती साजरी होऊ दिली जाते; मग श्रीरामनवमी का नाही ?’, ‘पोलिसांकडून मशिदींवरच्या अवैध भोंग्यांविषयी काय कारवाई केली जाते ?’, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. (हिंदूंना एक न्याय आणि मुसलमानांना दुसरा न्याय लावण्याची वृत्ती असेल, तर सर्वांना समान न्याय काय मिळणार आणि कायद्याचे राज्य तरी कधी अनुभवायला येणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. अखेर पोलिसांनी माघार घेत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची सुटका करून दुसर्या दिवशी म्हणजे ५ एप्रिलला नियोजित ठिकाणी कार्यक्रम करण्याची अनुमती दिली.
पोलिसांच्या अन्याय्य कृतीचा निषेध करण्यासाठी हिंदू संघटित !
श्रीरामनवसी उत्सव साजरा करण्यास विरोध करण्याच्या पोलिसांच्या अन्याय्य कृतीचा निषेध करण्यासाठी अंदाजे २०० हिंदुत्वनिष्ठ युवक संघटित झाले. ‘कुठल्याही परिस्थितीत श्रीरामनवमीचा कार्यक्रम नियोजित ठिकाणीच घेतला जाईल’, अशी ठाम भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी घेतली आहे. (अन्यायाच्या विरोधात संघटित होणार्या हिंदूंचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
श्रीरामनवमी उत्सवाची रीतसर अनुमती देण्यास पोलिसांचा नकार !
कार्यक्रमाची रीतसर अनुमती घेण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते पोलीस ठाण्यात गेले होते. त्यासाठीचे निवेदनही पोलिसांना देण्यात आले; मात्र पोलिसांनी श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यास स्पष्ट शब्दांत नकार देऊन कार्यकर्त्यांनाच दमदाटी केली; मात्र प्रभू श्रीरामचंद्र हे आराध्य दैवत असल्याने त्यांच्या जन्मदिनी त्यांची उपासना करण्याचा कार्यक्रम करण्याची ग्रामस्थांची भावना आहे; अशी प्रतिक्रिया हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. (एक तर पोलिसांकडे कार्यक्रमाची अनुमती मागितल्यावर ती द्यायची नाही, कार्यकर्त्यांनाच दमदाटी करायची आणि धार्मिक श्रद्धेपोटी कार्यक्रम आयोजित केल्यास तो बंद पाडायचा, अशा कार्यपद्धतीमुळेच हिंदूंचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे ! अशा पोलिसांवर सरकारने कारवाई करण्याची मागणी हिंदूंनी केल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात