बंदीनंतरही मिरवणूक काढण्याच्या प्रयत्नामुळे तणाव
मशिदी आहेत म्हणून हिंदूंच्या मिरवणुकांवर बंदी घालायला हा काय पाकिस्तान आहे ? आता याला ‘निधर्मीवाद’ म्हणायचा का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
हजारीबाग (झारखंड) : येथील हजारीबाग ते बडकागाव या मार्गावर वर्ष १९८४ पासून धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी आहे. तरीही येथे ४ एप्रिलला माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अटक केली. यानंतर नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केल्याने तणाव निर्माण झाला. या मार्गावर अनेक मशिदी असल्याने येथे मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात